सामाजिक

संत गाडगेबाबा आश्रमाचे वतीने २५ डिसेंबरला विचार समन्वय परिषद…

महेंद्र हरले

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

जरुड:संत गाडगेबाबा बहुद्देशीय आश्रमाचे वतीने सोमवार दिनांक २५ डिसेंबर ,२०२४ रोजी दुपारी १ वाजता उत्क्रांती परिसरातील सभागृहात बुध्द मार्क्स फुले शाहू आंबेडकर आंबेडकर लोहिया आणि क्रांतिकारी संत विचार चळवळ समन्वय परिषद आयोजीत केली आहे.
अशोक सरस्वती या परिषदेचे अध्यक्षस्थानी राहतील.सुप्रसिद्ध फुले आंबेडकरी विचारवंत
बहुजन संघर्ष समितीचे अध्यक्ष नागेश चौधरी प्रमुख मार्गदर्शक राहतील.उत्क्रांती मंडळाचे.दादासाहेब रा.ना.वानखडे परिषदेचे स्वागताध्यक्ष असतील. गांधीवादी प्रफुल्ल गुडधे,लोहियावादी ऍड.आराधना भार्गव,
मार्क्सवादी कॉ.चित्रा वंजारी आणि प्रा.डॉ.जावेद शेख या परिषदेत प्रतिनिधित्व करतील.
भाई अरविंद वानखेडे भूमिका मांडतील.
महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,
संत जगनाडे महाराज पुण्यतिथी आणि येशू ख्रिस्त यांचे जयंती निमित्त

 


३० वा प्रबोधन यात्रा महोत्सवाचे आयोजन संत गाडगेबाबा बहुद्देशीय आश्रमाचे वतीने करण्यात आले आहे.यात्रेची सुरुवात २९ नोव्हेंबर.,२०२४ रोजी संत गाडगेबाबा जन्मभूमी
शेंडगाव येथून करण्यात आली आणि समारोप या परिषदेने जरुड येथे होत आहे.
तरी परिषदेला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याची विनंती अशोक सरस्वती,भाई अरविंद वानखडे, शंकर ब्राम्हणे,
वसंत वावरे,सी. टी. पठाण,प्रा.गंगाधर दवंडे,रामेश्वर पाटील,
जानराव बासुंदे,गौतम झाडोदे यांनी केली आहे.


Share
ही बातमी वाचा.  बौद्धांची राज्यातील राजकीय दशा आणि दिशा...

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.