आपला जिल्हासामाजिक

महाबोधी महाविहार मुक्तीकरिता बहुजन वंचित क्रांती सेनेचे आंदोलन

प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

काटोल: महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणी करीता काटोल येथे बहुजन वंचित क्रांती सेनेचे तीव्र आंदोलन….


बिहार येथिल महाबोधी महावीहार मुक्ति करीता भिक्खू संघाकडून चालु असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काटोल येथे बहुजन वंचित क्रांती सेना समता सैनिक दल पंचशिल झेंडा समिति डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती च्या वतीने काटोल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात बहुजन क्रांति सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा काटोल न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे याच्या नेतृत्त्वात तीव्र नारेनिदर्शने करून जोरदार आंदोलन करण्यात आले

यावेळेस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतीच्या नावे निवेदन देण्यात आले यामध्ये 1949 चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा रद्द करून विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे.देशभरातील सर्व बौद्ध स्थळांच्या सौरक्षणासाठी स्पेशल कायदा करून त्यांना सुरक्षा द्यावी. आंदोलनादरम्यान बिहार पोलिसांनी उपोषण कर्त्या भिक्खूवर लाठीचार्ज करत आंदोलन चिघडवले व जबरान आंदोलन कर्त्याना तुरुंगात टाकले अशा पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. अशा मागण्या करण्यात आल्या लवकरात लवकर केंद्र व राज्य सरकारांनी आंदोलन करणाऱ्या भिख्खूसंघाची बौद्ध बांधवांशी चर्चा करून मागण्या मंजुर कराव्या अन्यथा संपूर्ण देशात आंदोलन तीव्र होईल मग परिस्थिती हाताळणे शक्य होणार नाही काटोल मध्येही पुढील काळात अतिशय तीव्र आंदोलन केल्या जाईल असे दिगांबर डोंगरे यांनी इशारा दिला
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते एस डी ओ कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला आंदोलन कर्त्यानी सरकारच्या विरोधात घोषणा देवुन परिसर दणाणून सोडला
भंते दिपंकर भंते धम्मरक्षित यांचे सह स्मारक समितीचे अध्यक्ष दिगांबर डोंगरे सचिव हर्षद बनसोड ललिता दुपारे नरेंद्र डोंगरे तानबाजी शृंगारे काटोल न प चे सेवानिवृत्त इंजिनियर राजेंद्र काळे रवि दलाल कृष्णा गवईकर सुमेध गोंडाने मिना पाटील प्रज्ञा डोंगरे रिना बनसोड प्रा रामेश्वर डोंगरे भोजराज बागडे प्रा रवींद्र सोमकुवर श्रीकांत गौरखेडे सोमल सोमकुवर सुरेशराव देशभ्रतार दिगांबर भगत प्रा पी एस मेश्राम गुलाबराव शेंडे गौतम गजभिये बळवंतराव नारनवरे रामराव पाटील बाबाराव गोंडाने मानिकराव गोलाईत अर्जुन शेंडे जिवन वाहने अनिल मेश्राम निळकंठ गजभिये दिपाली गौरखेडे नीलिमा बागडे कविता गजभिये कविता मडके निलिमा बागडे सुजाता डबरासे पुजा नीकोसे रामराव पाटील एकनाथ पाटील धर्मपाल पाटील रोशन भगत सुरेंद्र घोरपडे अशोकराव बागडे गौतम फुले यशवंत शेंडे संभाजी सोनुले दिलीपराव लांजेवार शीला रक्षित निर्मला रक्षे वैशाली दलाल अर्चना झिल्पे प्रियंका डंभाळे शेवंता बागडे हर्षा नारनवरे दिपीका गावंडे प्रज्ञा बांगर निर्मला मेश्राम कल्पना चक्रपाणी पदमा गायकवाड इंदिरा गजभिये सुनंदा जाधव कांता वरघट बेबी बोरकर शोभा पाटील ज्योत्स्ना धवराळ ताराचंद गौरखेडे विनायक ढोणे श्रिकिसन ढोके नत्थुजी भाजिखाये रितेश गजभिये मिलिंद मेश्राम प्रफुल्ल सोमकुवर वसंता डोंगरे गजेंद्र सोमकुवर शंकर आत्राम मनोज देशभ्रतार मोनु डंभाळ राजेंद्र बागडे बिना शेंडे जयमाला मनोहरे सुजाता वाहने नामदेवराव रक्षित यांच्यासह शेकडो आंबेडकरी चळवळीतील कार्यकरते व बौद्ध बांधव उपस्थित होते

ही बातमी वाचा.  रोटरी क्लब वरुड च्या वतीने गरजू महिलांना साड्या आणि भेटवस्तू...

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.