आपला जिल्हा

लोकमान्य मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालय नरखेड या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न…

महेंद्र हरले

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

नरखेड:लोकमान्य मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालय नरखेड या शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी लोकमान्य मतिमंद व कर्णबधिर निवासी विद्यालय नरखेड या शाळेत ध्वजारोहण समारोह उत्साहात संपन्न झाला.

वरुड येथील प्रसुतीरोग तज्ञ डॉ. मनोहर आंडे यांचे हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील दिव्यांग मतिमंद व कर्णबधिर विद्यार्थ्यांनी विविध कवायती व देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव सारंग अनव्हाने, युवा व्यापारी संघ वरूडचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल, वरुडच्या माजी नगराध्यक्ष जयाताई नेरकर, सामाजिक कार्यकर्ता प्रज्ञाताई बोडखे, पूजाताई अग्रवाल, धीरज अनव्हाने, मुख्याध्यापक मीनाताई बोंद्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी दिव्यांग मतिमंद व कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींनी कौतुक केले. या कार्यक्रमात नुकत्याच संपन्न झालेल्या नागपूर जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत लोकमान्य मतिमंद निवासी विद्यालय नरखेड या शाळेची विद्यार्थिनी सोनम यादव हिने स्पॉट जम्प स्पर्धेत प्रथम क्रमांक व 50 मीटर धावणे या शर्यतीत द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तसेच वैशाली उईके 50 मीटर धावणे या शर्यतीत द्वितीय क्रमांक व सॉफ्ट बॉल थ्रो स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करून प्राविण्य मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जितेंद्र शेटीये यांनी केले. मानवंदना कार्यक्रम शारीरिक शिक्षक सुनील मानकर व राज्यघटना उद्देशिका वाचन शारीरिक शिक्षक दिनेश अखंड यांनी केले. आभार प्रदर्शन विशेष शिक्षक विकास मुसळे यांनी केले. या कार्यक्रमात लोकमान्य मतिमंद निवासी विद्यालय, नरखेड व लोकमान्य कर्णबधिर निवासी विद्यालय, नरखेड या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

ही बातमी वाचा.  भाजपा (महायुती) सरकार संविधान विरोधी -दिगांबर डोंगरे

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.