राजकीय

मोदी शहाच्या गुलामगिरीतुन महाराष्ट्राला मुक्त करणार -ठाकरे

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंधे सरकारचा खरपूस समाचार घेतला. गद्दारी केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीशी झालेली नाही, तर महाराष्ट्राशी झालेली आहे. महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झाली आहे अशा पद्धीतीने सरकार चालवले जात आहे. सर्वच बाबतीत बोजवारा उडाला असून हे सरकार घालवावेच लागेल, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

  • वांद्रे पश्चिम येथील हॅाटेल ताज लँडस् एन्डमध्ये महाविकास आघाडीने राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारच्या काळ्या कारभाराचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासादर वर्षा गायकवाड, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

Share
ही बातमी वाचा.  Apple sets March 21 event, Wall Street sees new, smaller iPhone

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.