ताज्या घडामोडीराजकीय

देवेंद्र भुयार होल्डवर…..

मुंबई प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

भाजपाचे राजकारण : मोर्शी-वरुड विधानसभा मतदारसंघात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. अजितदादा यांच्या जवळचे मानले जात असलेले येथील अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप केलेली नाही.

दुसरीकडे काल (गुरुवारी) भाजप सोडून गेलेल्या इच्छुक पदाधिकारी उमेश यावलकर आज (शुक्रवारी) पुन्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. हे बघता उमेश यावलकर यांचे नाव मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी निश्चित केले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे मतदार दरवेळी नवा आमदार निवडून देतात. विद्यमान आमदार भुयार यांनी भाजपचे राज्यसभा सदस्य व माजी मंत्री अनिल बोंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे बोंडे हेसुद्धा अपक्ष निवडून आले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पराभूत झाले. त्यांना आता राज्यसभेवर पाठवण्यात आले आहे.

आमदार देवेंद्र भुयार अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतरही ते त्यांच्यासोबत आहेत. शिंदेसेनेची त्यांना ऑफर होती. गोहाटीमध्ये त्यांना बोलावले होते. मात्र त्यांनी यास ठाम नकार देऊन अजित पवार यांच्यासोबत राहण्याचे ठरवले होते. मात्र महायुतीमुळे आता त्यांची अडचण झाली आहे.

भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदारसंघ भाजपने अजित पवार यांच्यासाठी सोडला आहे. आमदार सुलभा खोडके यांची उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. मात्र भुयार यांना होल्डवर ठेवण्यात आले आहे. या घडामोडी बघता मोर्शी विधानसभा भाजपच्या वाट्याला येण्याची दाट शक्यता वर्तविली जाते. याच कारणामुळे यावलकर यांना परत प्रवेश देण्यात आला असा कयास वर्तविला जात आहे.

ही बातमी वाचा.  अनिस अहमद यांना वंचितची उमेदवारी मिळून सुद्धा वंचितच राहिले!

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.