WhatsApp यूझर्ससाठी गुडन्यूज! आता एका क्लिकमध्ये ओळखू शकाल बनावट फोटो….
विशेष प्रतिनिधी

मुंबई : आजच्या काळात व्हॉट्सॲप हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. आता डेली रुटीन जीवनात व्हॉट्सॲपची भूमिका खूप वाढली आहे. जगभरात 4 अब्जाहून अधिक लोक त्याचा वापर करतात. आपल्या लाखो यूझर्सच्या सोयीसाठी, कंपनी वेळोवेळी नवीन फीचर आणत असते. आता व्हॉट्सॲप एक फीचर आणणार आहे. जे तुम्हाला ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यापासून वाचवू शकते.
खरंतर, आजकाल व्हॉट्सॲप अशा एका फीचरवर काम करत आहे. ज्याद्वारे तुम्ही खरे आणि बनावट फोटो सहज ओळखू शकता. कंपनी आपल्या वेब यूझर्ससाठी रिव्हर्स इमेज सर्च फीचर डेव्हलप करत आहे. या फीचरच्या रोलआउटनंतर, तुम्ही एका क्लिकवर ॲपवरील फोटो व्हेरिफाय करु शकाल. याच्या मदतीने तुम्हाला पाठवलेला फोटो खरा आहे की खोटा हे तुम्ही शोधू शकाल.
व्हॉट्सॲपच्या नव्या फीचरमुळे फसवणुकीला आळा बसणार आहे
अलीकडच्या काळात ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये बनावट फोटो पाठवून लोकांना फसवणुकीचे बळी बनवले गेले आहे. फसवणुकीचा बळी बनवण्यासोबतच खोटी आणि दिशाभूल करणारी माहितीही बनावट फोटो पसरवून पसरवली जाते. एआयचा वापर वाढल्याने बनावट फोटोंच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता व्हॉट्सॲपने रिव्हर्स इमेज सर्च फीचर आणले आहे.
बनावट फोटो ओळखणे सोपे होईल
रिव्हर्स इमेज सर्च फीचरमध्ये तुम्ही गुगलवर कोणताही फोटो एका क्लिकवर सहजपणे शोधू शकाल आणि तो खरा आहे की खोटा हे ओळखू शकाल. या फीचरच्या मदतीने व्हॉट्सॲप यूजर्स फेक न्यूजपासून स्वतःचे संरक्षण करू शकतील. कंपनीच्या अपडेट्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट Wabetainfo ने आपल्या रिपोर्टमध्ये WhatsApp च्या या फीचरची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीने सर्च इमेज ऑन बेस फंक्शनवर काम सुरु केले आहे.
व्हॉट्सॲपचे हे फिचर अद्याप डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. कंपनी लवकरच त्याची चाचणी सुरू करणार आहे. ते प्रथम BT यूझर्ससाठी चाचणीसाठी आणले गेले आहे. व्हॉट्सॲप सुरुवातीला हे रिव्हर्स इमेज सर्च फीचर वेब यूजर्ससाठी आणणार आहे. नंतर ते Android आणि iOS यूझर्ससाठी लॉन्च केले जाऊ शकते.