
वर्धा: बहुजन समाज पार्टी तर्फे वर्धा येथील हॉटेल विद्यादिप रिजेंसी मध्ये विधानसभा निवडणूकी संदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या,
याप्रसंगी बसपा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी इंजी.रामजी गौतम, नर्मदाप्रसाद अहिरवार , प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनील डोंगरे,प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे,झोन इन्चार्ज मोहन राईकवार तसेच विदर्भातील सर्व प्रदेश पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी व विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते
विदर्भात बसपाचा गड म्हणून उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राची ओळख आहे,कारण या विधानसभा क्षेत्रामधून मधून महानगरपालिका मधील निवडणुकीत साल 2002 पासून अनुक्रमे 9,4,12 आणि सध्याच्या परिस्थितीत 10 नगरसेवक निवडून आलेले आहेत,आणि 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत किशोर गजभिये यांना 55,187 मते मिळाली होती त्यामुळे काँग्रेस चे नितीन राऊत यांचा पराभव झाला होता,2019 ला सुरेश साखरे यांना याच विधानसभा क्षेत्रातून 23,333 मते मिळाली होती, म्हणून हा मतदारसंघ बसपाकरिता विशेष महत्वाचा दिसते,
- अश्या परिस्थितीत या क्षेत्रातून नेहमीच अनेक व्यक्ती उमेदवारी मागतात त्याच अनुसंगाने मागील 20 वर्षांपासून बुद्धम राऊत हे सुद्धा दावेदारी करिता प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांच्या वाट्याला आजपर्यन्त बसपातर्फे ही विधानसभा आलेली नाही,
परंतु या 2024 च्या निवडणूकित बुद्धम राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्यांची उत्तर नागपूर विधानसभेची उमेदवारी नवनियुक्त अध्यक्ष सुनील डोंगरे यांनी निश्चित केलेली आहे त्यामुळे ते मागील 3 ते 4 महिन्यापासून कामाला सुद्धा लागलेले आहेत आणि आपला जनसंपर्क सुद्धा त्यांनी वाढविलेला आहे,
तरी अश्या परिस्थितीत सुद्धा याच उत्तर नागपूर विधानसभा मधून राजू भांगे आणि अतुल खोब्रागडे सोबतच अन्य लोकांनी सुद्धा उमेदवारी करिता अर्ज केलेले असून मुलाखती सुद्धा दिलेल्या आहेत,
आता खऱ्या अर्थाने कोन या विधानसभेमध्ये बसपच्या उमेदवारीचे बाशिंग बांधेल हे काही दिवसातच कळेल….