राजकीय

विक्रम ठाकरे यांच्या प्रचार कार्यालयाचे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न

महेंद्र हरले वरुड

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

मोर्शी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेले विक्रम नरेशचंद्र ठाकरे यांच्या वरुड मोर्शी व शेंदुर्जना घाट या तिन्ही शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी वरूड शहरातील महात्मा फुले चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. वरुड आणि मोर्शी तालुक्यात दांडगा जनसंपर्क असलेले विक्रम ठाकरे हे अपक्ष उमेदवार म्हणून मोर्शी विधानसभेची निवडणूक लढत आहेत. सध्या मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत असून विक्रम ठाकरे हे सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून प्रचारात आघाडीवर आहेत. त्यांनी आपला कायम ठेवलेला सततचा जनसंपर्क आणि कायम ठेवलेली विक्रम ठाकरे मित्र परिवाराची मित्रमंडळी या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. मोर्शी विधानसभा मतदारसंघात सध्या युवा वर्गाच्या तसेच जनसामान्यांच्या आवडीचा विषय असलेले विक्रम नरेशचंद्र ठाकरे हे आपले लिफाफा हे चिन्ह घेऊन ही निवडणूक लढत आहेत.

त्यांच्या प्रचार कार्यालयाचे वरुड शहरातील दिनेश खेरडे शेंदूरजनाघाट येथे रुपराव बेले तर मोर्शी येथे अँड प्रमराज वर्मा,बाबूजी जोशी या मान्यवरांच्या शुभहस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.वरुड शहरातील व परिसरातील विक्रम ठाकरे यांचे शेकडो समर्थक याप्रसंगी उपस्थित होते.

ही बातमी वाचा.  रामटेकमधून विशाल बरबटे यांनी शक्ती प्रदर्शन करीत भरला उमेदवारी अर्ज....

या प्रसंगी माध्यमांशी बोलताना माझी उमेदवारी ही केवळ राजकारण म्हणून नव्हे तर जनसामान्यांना न्याय देण्याकरिता व मतदार संघाचा शाश्वत सर्वांगीण विकास साधण्याकरिता आहे. वरुड तसेच मोर्शी या दोन्ही शहर व तालुक्यातील समस्या केंद्रस्थानी ठेवून मी काम करणार असल्याचे प्रतिपादन विक्रम ठाकरे यांनी याप्रसंगी केले.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.