गाडीत 15 कोटी सापडले, पण 5 कोटी कशे झाले समझलंच नाही -रवींद्र धंगेकर गंभीर आरोप करत म्हणाले, ‘त्या’ गाडीत शहाजीबापुंची माणसं
पुणे प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना खेड शिवापूर टोलनाका येथे एका गाडीमध्ये तपासणी दरम्यान पाच कोटी सापडल्याचे निष्पन्न झाले आहे. हे 5 कोटी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदाराचे असल्याचा आरोप करण्यात येत आहेत. आता या प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडत असून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांकडे करोड रुपये पोहोचवले जात आहेत. शिवापूर टोलनाक्यावर पैसे सापडल्याची घटना समोर आली मात्र अनेकदा पोलिस बंदोबस्तामध्ये हे पैसे पोहोचवले जातात. एसीपी, डीसीपी या पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यात देखील पैसे पोहोचवले जातात’, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, सध्या सर्व निवडणूक यंत्रणा भाजपने हायजॅक केल्या आहेत. शिवापूर टोल नाक्यावर जी गाडी पकडण्यात अली त्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची माणसं होती. सुरुवातीला गाडीतून 15 कोटी सापडल्याचा समोर आलं होतं. मात्र त्या पंधरा कोटींचे पाच कोटी कधी झाले हे समजलंच नाही.
पोलिसांवर कारवाई करा
सिस्टीम मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून या यंत्रणेचा वापर केला जात आहे. अशा पद्धतीने जर पैसे पकडले गेले तरी ते घर पर्यंत पोहोचवण्याचं काम हे पोलिसांनी केला आहे. हे पैसे जप्त न करता कोणत्याही कारवाई न करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे देखील धंगेकर यांनी सांगितलं.
तसेच एकीकडे माझ्यावर दिवाळी सरंजाम वाटत असल्याचा खोटा गुन्हा दाखल केला गेला. दुसरीकडे आमदारांचे पकडलेले पैसे पोलिसांनी घरपोच पोचवले त्यामुळे या यंत्रणांचा उपयोग विरोधकांना त्रास देण्यासाठीच होत असल्याचा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.