खुशाल लांजेवार वरती हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करुन कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत शिवसेनाने दिले पोलीस अधिक्षकांना निवेदन….
विशेष प्रतिनिधी

नागपूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्य संघटक सागर डबरासे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम मस्के, जिल्हाप्रमुख उत्तम कापसे यांच्या नेतृत्वात नागपूर ग्रामीण चे अप्पर पोलीस अधीक्षक धुमाळ यांना निवेदन देण्यात आले,
याप्रसंगी खुशाल लांजेवार,प्रकाश वारे,प्रशांत पाहुणे,सुरेश आंबीलधुके,गणेश मस्के,अमन मालवे,श्रावण गवळी, शांताराम गुंडे, उमेश धनविजय, शेजु तिजघरे,सुरेश निखार,निरंजन कोर, शंकर कोर व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते,

निवेदनात म्हटले की सूचित करीत आहोत की श्री. खुशाल शामरावजी लांजेवार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमरेड विधानसभा संघटक आहेत आणि मुक्काम, वार्ड क्रमांक 14 कुही ता. कुही जि. नागपूर येथील रहिवासी असून त्यांच्या म्हणण्या नुसार दिनांक 16/04/2024 रोजी रात्री 9:30 च्या दरम्यान बाजार रस्त्याने घरी जात असताना चार व्यक्ती कट करून त्यांचा पाठलाग करीत होते त्या चार लोकांनी कुही जुनी नगरपंचायत ते कुही पंचायत समिती या स्थळी स्कॉर्पिओ गाडी आडवी लावून त्यांची मोटरसायकल थांबून त्यांना लाकडी दंड्याने जबर मारहाण केली त्यावेळी त्यांच्याजवळ स्कार्पिओ गाडी होती त्या स्कार्पिओ गाडीमध्ये एकूण पाच व्यक्ती होते त्यापैकी चार जण त्यांना काठीने मारहाण करत होते तर एक व्यक्ती मधल्या सीटवर बसून पाहत होता आणि हे सर्वच आरोपी तोंडाला कापड बांधून होते आणि विशेष करून ही स्कार्पिओ गाडी बिगर नंबर प्लेटची होती,
लांजेवार यांना मारहाण सुरू असताना ते कसेतरी त्यांच्या तावडीतून सुटून घराकडे पळायला लागले तरी ते चार व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत होते म्हणजे याचा अर्थ की श्री लांजेवार यांना जीवनातून कायमचा संपवण्याचा त्यांचा कट होता, लांजेवार हे घरी पळत असताना त्यांनी मागे वळून पाहिले तर ही स्कार्पिओ गाडी नागपूरच्या दिशेने जाताना त्यांना दिसली,
त्यानंतर लांजेवार यांनी कुही पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता कुही पोलिसांनी काही आरोपींना अटक केले आहे, परंतु मुख्य आरोपी सौरव परमानंद दंडारे सोबत सोबत अन्य काही आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत आलेले नाहीत,
कुही पोलीस द्वारा सापडलेल्या आरोपीवर ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे होती आणि त्या पद्धतीने कलमा लावायला पाहिजे होत्या त्या लावल्या गेलेल्या नाही म्हणून अटक झालेल्या आरोपींना ताबडतोब कोर्टाने जामीन मंजूर केला आणि ते बेधडक बाहेर फिरत आहेत,
श्री लांजेवार यांच्या मते त्यांना मारण्याची सुपारी मुख्य आरोपीने अन्य लोकांना दिली होती, त्या पद्धतीने त्यांनी त्यांना जीवाने मारण्याची पूर्ण प्लॅनिंग केलेली होती, परंतु सुदैवाने श्री लांजेवार हे थोडक्यात बचावले,
हा सर्व प्रकार मुख्य आरोपी सौरभ परमानंद दंडारे यांनी रेल्वेच्या जमिनीवरील सरकारी रेती, मुरूम आणि माती चोरल्याचे आरोप सिद्ध झाल्यामुळे सौरभ
मा.तहसीलदार कुही यांनी परमानंद दंडारे व अन्य वरती एकून 1,98,05,600 (,एक करोड अठ्यांनव लाख पाच हजार सहासे रुपये) एवढा दंड लावून लगेच सरकारी खजिन्यात ही रक्कम जमा करण्याचे दि.9/2/2023 रोजी आदेश दिलेत, परंतु आरोपीने ही रक्कम जमा न केल्यामुळे श्री. लांजेवार यांनी तहसीलदार, एस.डी.ओ. तसेच अन्य सरकारी कार्यालयात लेखी तक्रारी दिल्यात म्हणून आरोपीकडून त्यांना संपविण्याचा कट आखन्यात आला आहे,
परंतु अश्या परिस्थितीत सुपारी देणारा मुख्य आरोपी सौरभ परमानंद दंडारे हा बाहेर असल्यामुळे तो पुन्हा श्री.लांजेवार यांच्यावर प्राण घातक हल्ला करून त्यांना जीवनातून संपऊ शकते,
श्री. लांजेवार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे कारण त्यांना व त्यांच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे.
म्हणून हा तपास क्राईम ब्रँच कडे देऊन मुख्य आरोपी सोबत सोबत अन्य आरोपींना सुद्धा ताबडतोब अटक करण्याचे आदेश देण्याबाबत निवेदन देण्यात आले,यावर धुमाळ यांनी आरोपीना लवकरच अटक करून त्यांच्या वरती अजून काही कलमा वाढविल्या जातील अशे आश्वासन दिले.