क्राईम स्टोरीमहाराष्ट्र

पतंगबाजीवर कायमची बंदी करिता रिपब्लिक फेडेरेशन तर्फे मुख्यमंत्र्याना निवेदन

प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

नागपूर:रिपब्लिक फेडेरेशन संघटना तर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी नागपूर मार्फत रिपब्लिक फेडेरेशन चे संस्थापक अध्यक्ष सागर डबरासे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष धर्मपाल वंजारी यांच्या नेतृत्वात निवेदन दिले,याप्रसंगी शरद दंडाळे, नितेश रंगारी,नरेंद्र तिरपुडे, अर्पित बागडे, अरविंद कारेमोरे उपस्थित होते,

निवेदनात म्हटले की महाराष्ट्र राज्यात पतंगबाजीवर बंदीवर बंदी घालण्याबाबत की राज्यात पतंगबाजी मोठ्या प्रमाणात होत असते,
आणि या पतंगबाजीमध्ये दुसरीकडील पतंग काटण्याकरिता नायलॉन मांज्याचा उपयोग केला जातो,आणि हा नायलॉन मांजा खूप मजबूत धारदार असतो की ज्यामुळे शरीराचा कोणताही पार्ट आसानीने कटते,
त्यामुळे राज्यातील अनेक शहरात सोबत सोबत विशेषतः नागपूर मध्ये या पतंगबाजी मुळे दरवर्षी अनेक लोकांचे आणि प्राणी तसेच पक्षांचे जीव गेलेले आहेत आणि अनेक गंभीर स्वरूपात जख्मी होऊन अपंग सुद्धा झालेले आहेत,
याला कारण म्हणजे पतंगबाजी आणि त्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा आहे,
याबाबत दरवर्षी नायलॉन मांजा वर बंदी घालण्याबाबत प्रशासनाद्वारे परीपत्रक काढले जाते आणि येवढेच नाही तर मा.हायकोर्ट यांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे,
तरीसुद्धा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नागपूर शहर आणि ग्रामीन मध्ये दररोज लाखोचा नायलॉन मांजा प्रशासनाद्वारे जप्त केला जात आहे,
आणि ज्यांच्याकडे हा मांजा सापडतो त्यांच्या थातूर मातूर कारवाई करून त्यांना सोडून दिले जाते,
म्हणून प्रशासनाने फक्त नायलॉन मांजा वरच प्रतिबंध लावले तरी काहीही होणार नाही म्हणून मांजा सोबत सोबत संपूर्ण पतंगबाजी वरच कायमची बंदी घालावी,कारण संपूर्ण नायलॉन मांजा जप्त करण्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर प्रशासना कडे तेवढे मनुष्यबळ नाही म्हणून असले जीवहाणे प्रसंग नेहमी घडतंच राहतील,
आणि पतंगबाजी म्हणजे कोणताही राष्ट्रीय सण नाही की ज्यामुळे कोणत्या समुदायाच्या भावना दुखावतील तर पतंग बाजी हा एक प्रकारचा जुगार आहे यावर लाखो रुपयाचा जुगार खेळला जातोय म्हणून आपण यावर कायमची बंदी घालून या पतंगबाजीला गैबलर खेळ म्हणून घोषित करावा,
व ज्यांच्या कडे नायलॉन मांजा सापडेल त्यांच्या वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मकोका कायद्याखाली खटले चालवावे अन्यथा सरकारविरोधात कोर्टात केस चालविली जाईल अशी सूचना प्रशासणाला दिली.

ही बातमी वाचा.  After all is said and done, more is said than done

 


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.