
रामटेक विधानसभा क्षेत्रातुन महाविकास आघाडी प्रणित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री. विशाल गंगाधर बरबटे यांची जबरदस्त शक्तिप्रदर्शन प्रचार रॅली आज सकाळी दहा वाजता कन्हान शहरातून सुरू होऊन कांद्री ते पारशिवनी वरून मनसर ला जात शेवटी रामटेकला रॅलीचे समापन झाले,
विशाल बरबटे यांच्या रॅलीमध्ये जवळपास पाचशे मोटरसायकल आणि दीडशे चार चाकी वाहनाचा समावेश दिसून आला त्यामुळे ही रॅली दोन किलोमीटर पर्यंत अंतरावर विशाल स्वरूपात दिसून येत होती, रॅलीमध्ये शिवसैनिकांच्या “जय भवानी,जय शिवाजी”, “विशालभाऊ आप आगे बढो हम आपके साथ है”
“विशाल आणि मशाल” च्या जयघोषामुळे कन्हान, पारशिवनी आणि मनसर तसेच रामटेक शहर दणाणून गेले,
यामध्ये जागोजागी बरबटे यांना नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळताना दिसला,
या जबरदस्त शक्ती प्रदर्शनामुळे रामटेक विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहवयास मिळाला याप्रसंगी सर्व शिवसैनिकाच्या तोंडून विशाल बरबटेच ही विधानसभा जिंकून येणार हीच भाषा ऐकायला मिळत होती.
रॅलीमध्ये शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पण काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.