क्राईम स्टोरी

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या..

कोण होते बाबा सिद्धीकी?

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

  1.  बाबा सिद्दीकी हे गेली 48 वर्ष काँग्रेससोबत होते. सिद्दीकी यांनी आठ महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सिद्दीकी यांनी 10 फेब्रुवारी 2024 ला काँग्रेसचा राजीनामा देत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. गेली 48 वर्ष त्यांनी काँग्रेससोबत निष्ठेने काम केले होते. शनिवारी रात्री बांद्रा पूर्वेत खेरवाडीत तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दिकी यांची नियुक्ती केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या (Congress) समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.
कोण आहेत बाबा सिद्दीकी

मुंबई काँग्रेसमधील बाबा सिद्दीकी मोठे नेते होते. मुस्लिम चेहरा म्हणून ते राजकारणात प्रसिद्ध आहेत. तीन वेळा ते वांद्रा येथून आमदार राहिले आहेत. विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले.

तीन टर्म होते आमदार

त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये वांद्रे मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

ही बातमी वाचा.  Persuasion is often more effectual than force

सिद्दीकी बिहारचे पण राजकीय कारकीर्द मुंबईत

बाबा जियाउद्दीन सिद्दीकी हे मूळचे बिहारमधील आहेत. परंतु त्यांनी राजकीय कारकीर्द मुंबईत केली. त्यांचे चिरंजीव जिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार आहेत, तर त्यांची मुलगी अर्शिया सिद्दीकी या डॉक्टर आहेत तर पत्नी शहजीन गृहिणी आहेत.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.