ऍड. सुरेश माने,ओबीसी नेते प्रकाश शेडगे, आनंदराज आंबेडकर निर्मित आरक्षणवादी आघाडी राज्यात लढविणार 288 जागा….
मुंबई प्रतिनिधी

ओबीसी नेते प्रकाश बापू शेडगे, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. सुरेश माने, रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी आनंदराज आंबेडकर सोबत सोबत अन्य छोट्या मोठ्या राजकीय पक्षांनी “आरक्षणवादी आघाडी” च्या नावानी चौथी आघाडी स्थापन करून राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार लढविण्याचे ठरविले आहे,
त्यानुसार काही उमेदवार या आघाडीने जाहीर सुद्धा केलेले आहेत,
एकीकडे संविधान व लोकशाही विरोधी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना व काही मित्र पक्षांनी
महाविकास आघाडीची स्थापना करून भाजपाविरोधात बंड पुकारलेले आहे,
तर दुसरीकडे राज्यात तिसरा पर्याय असलेली वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी स्वबळावर निवडणुका लढवित आहेत,
त्यानंतर सुद्धा मराठा नेता म्हणून जरांगे पाटील हे सुद्धा सतत 24 तास उमेदवाराच्या मुलाखती घेऊन विधानसभा निवडणुकीत उमेदवार टाकण्याचे संकेत देत आहेत,
आता शेवटी ओबीसी नेते प्रकाश बापू शेडगे, एडवोकेट सुरेश माने, आनंदराज आंबेडकर व अन्य काही निळ्या झेंड्याच्या पक्षांनी “आरक्षणवादी आघाडी” स्थापन करून विधानसभा निवडणूक लढवीत आहेत,
याचा मताच्या रूपात होणारा तोटा कुठे ना कुठे महाविकास आघाडीलाच होण्याचे संकेत दिसत आहेत,
महाराष्ट्र राज्यात शेड्युल कास्टच्या मतांची संख्या भरमार आहे अशे असून सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रणित महाविकास आघाडीने राज्यातील काही निवडक पक्ष्यांना या निवडणुकीमध्ये सोबत घेऊन प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे होते परंतु महाविकास आघाडीने या नेत्यांना कुठेही जागा दिली नाही म्हणून शेवटी त्यांचे राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी त्यांना असल्या आघाड्या करण्याची गरज भासत आहे,अशी भाषा अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे आणि नाव न छापण्याच्या शर्तीवर काही प्रमुख नेत्यांनी दर्शन एक्सप्रेस न्यूज सी बोलताना सांगितले.
शेवटी राज्यातील मतदार राजा कोणाला आपली पसंती दाखऊन विधानसभेमध्ये पाठवीतो हे 23 नोव्हेंबरलाच कळेल….