आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणक्राईम स्टोरीमहाराष्ट्र

सैफअली खान वर हल्ला करणारा हल्लेखोराला बांगलादेशला परत जाण्यासाठी 50 हजारांची गरज होती; पोलिसांच्या तपासातून मोठी माहिती समोर

प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर हा मूळचा बांगलादेशी असून 12 पर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे. मुंबईत नोकरीच्या शोधात आलेल्या या हल्लेखोराला परत बांगलादेशात जायचं होतं. त्यासाठी त्याला 50 हजार रुपयांची गरज असल्याने त्याने सैफच्या घरी चोरीचा प्लॅन केल्याचं पोलिस तपासातून उघड झालं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की तो 12 वी उत्तीर्ण आहे आणि चांगल्या नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. आरोपी सध्या बेरोजगार असून त्याला बांगलादेशात परत जावे लागणार होते. त्यासाठी त्याला 50 हजार रुपयांची गरज होती. त्यामुळे त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पोलिस तपासातून उघड झालं आहे.

गेटवर सिक्युरिटी नसल्याने चोरीचा प्लॅन
इमारतीच्या गेटवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने आत प्रवेश करणे सोपं जाणार होतं. म्हणून हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याचा निर्णय घेतला. ही चोरी केल्यानंतर आरोपी गीतांजली एक्स्प्रेसने कोलकाता आणि तेथून बांगलादेशला पळून जाण्याची योजना आखत होता. मात्र प्लॅन अंमलात आणण्यापूर्वीच तो ठाण्यात पकडला गेला.

हल्लेखोर बांगलादेशी घुसखोर
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद शहजाद असं या आरोपीचं नाव असून तो बांगलादेशी घुसखोर आहे. मायदेशी पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. हल्लेखोर हा वरळी कोळीवाड्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. वरळीतील प्रजापती नावाच्या व्यक्तीच्या खोलीत तो राहत होता. तर वरळीतल्याच सिल्कवर्क या कॅफेमध्ये तो कामाला होता.

ही बातमी वाचा.  Hibs and Ross County fans on final

वरळीतील कॅफेनंतर तो ठाण्यातील एका हॉटेलमध्ये कामाला लागला. पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कामाला लावलं होतं. सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत तो ठाण्यातल्या हॉटेलमध्ये कामाला होता. ठाण्यातील हॉटेलमध्ये काम करताना त्याने आपली खरी ओळख लपवून विजोय दास असं नाव सांगितलं होतं. आधारकार्डवरही तसंच नाव होतं अशी माहिती हॉटेलच्या मॅनेजरने दिली.

सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर हा वांद्रेहून दादरला आणि त्यानंतर वरळी येथील सिल्कवर्क सिल्कवर्क कॅफेच्या ठिकाणी आला होता. पोलिसांनी या कॅफेतील काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तसेच त्यांचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत.

ऑनलाईन ट्रान्जेक्शन केल्याने पोलिसांनी माग काढला
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपीने ओळख लपवण्यासाठी वांद्रेमध्ये कपडे बदलले आणि दादर गाठलं. दादरहून वरळी कोळीवाड्यात तो गेला. वरळीतून सेन्च्युरी बाजार परिसरातील भुर्जीपावच्या गाडीवर त्याने नाष्टा केला. यावेळी आरोपीने ऑनलाईन पेमेंट केलं. ज्या मोबाईलवरुन त्याने हे ट्रान्जेक्शन केलं त्याच मोबाईलचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.