ताज्या घडामोडी

सुशील बेले आमरण उपोषण करणार!

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले यांनी शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांवर तहसीलदारांना दिला आंदोलनाचा इशारा.

वरुड तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न, शेतकरी व सामान्य नागरिकांचे प्रश्न तसेच जनतेच्या मागण्या यावर उपाययोजना होत नसल्याने असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार, तहसील कार्यालय, वरुड यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात सुशिल बेले यांनी शेतकरी आणि नागरिकांचे हिताचे खालील महत्त्वाचे मुद्दे ठळकपणे मांडले :

१) तहसील कार्यालय येथे तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी.
२) गारपीटचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याबाबत चौकशी व तत्काळ कार्यवाही.
३) पुनर्वसन विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतर सावंगी, चिचरगव्हाण, गाडेगाव, गणेशपुर, घोराड, हातुर्णा, इसापुर, कुरळी, चांदस, आमनेर, लिंगा, मालखेड, मोरचुद, पवनी, पोरगव्हाण, पुसला, शहापुर, सुरळी, वाडेगाव, वघाळ, वडली, वाठोडा, मोर्शी खुर्द, वेडापुर, अमडापुर, काटी, इत्तमगाव, शिगोरी, पळसवाडा, भापकी या सर्व गावांमध्ये विकासकामांसाठी निधी देण्यात आला. आतापर्यंत या पैकी बर्‍याच गावांमध्ये कामे झाली आहेत, पण ती कामे निकृष्ट दर्जाची झालेली असून अनेक ठिकाणी ती तुटलेली दिसून येतात. त्यामुळे तात्काळ स्थळचौकशी करून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे तसेच दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे.
४) प्रधानमंत्री विमा योजना २०२३-२४ अंतर्गत शेतकऱ्यांनी विमा भरूनसुद्धा त्यांना अद्यापपर्यंत विमा रक्कम वितरित न झाल्याबाबत सुशिल बेले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
५) तालुक्यातील पाधन रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदार व त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी.
६) गरजू लाभार्थ्यांना भूमिहीन राशनकार्ड धारकांना नियमितपणे धान्य देण्यात यावे. तसेच ज्या राशनकार्ड धारकांना रेशन मिळत नाही व पैसेही मिळालेले नाहीत, अशा शेतकरी व नागरिक लाभार्थ्यांना शासनाने नियमानुसार तात्काळ पैसे द्यावे.
७) १ एप्रिल २०२४ पासून आजपर्यंत झालेल्या अवैध वाळू तस्करीवर महसूल विभागाने केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती व जप्त वाळू कोठे जमा केली आहे याचा अहवाल जाहीर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी सुशिल बेले यांच्या नेतृत्वाखालील आक्रोश जनशक्ती संघटनेने केली.

ही बातमी वाचा.  24 वर्षीय महिलेला 8 महिन्यात उलट्या थांबता थांबत नव्हत्या; टेस्ट रिपोर्ट पाहून डॉक्टरांना बसला धक्का

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरील सर्व शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत निकाली काढण्यात यावेत. अन्यथा आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. उपोषणादरम्यान तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, घोषणाबाजी व रोजच्या समस्यांवर जनजागृती केली जाईल.

सुशिल बेले यांनी स्पष्ट इशारा दिला की, या उपोषणाला संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, नागरिक व आक्रोश जनशक्ती संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.