
नागपूर : नागपूरचे मुस्लिम दमदार नेते आणि माजी मंत्री अनिस अहमद यांना काँग्रेस कडून 2024 ची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून चिडून शेवटी त्यांनी मुंबई येथील राजगृह मध्ये वंचित चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश घेऊन VBA स्वीकारली, तेव्हा लगेच बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना मध्य नागपूर मधून
वंचित बहुजन आघाडी ची उमेदवारी जाहीर केली,
म्हूणन आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटी वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक नागपूर मधील मध्य नागपूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालया समोर त्यांची वाट बघत होते,
परंतु अनिस अहमद हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे 3 वाजून 1 मिनिटांनी पोहचले असता सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना आत मध्ये घेतले नाही,
तेव्हा त्यांनी आतमध्ये जाण्यासाठी खुप संघर्ष केला आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत पण केली,
परंतु त्यांनी वेळेची मर्यादा सांगत ज्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला 3 वाजता च्या आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हजर व्हावे लागते याचा हवाला देत त्यांना आतामध्ये घेतले नाही,
बातमी लिहत पर्यंत अनिस अहमद यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी आतमध्ये घेतलेले नव्हते,
म्हणून शेवटी अनिस अहमद यांच्या उमेदवारी वर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे,