महाराष्ट्र

MSRTC चा मोठा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

मुंबई :राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासूनच शाळा आणि कॉलेज सुरु होत असून राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांना एक गुड न्यूज दिली आहे. आता विद्यार्थ्यांना एसटी प्रवास पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये वितरित करणार आहे. यामुळे पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची गरज भासणार नाही. परिणामी त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.

रांग लावायची गरज नाही
परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी विद्यार्थी अथवा त्यांचे पालक एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहून पास मिळवत असत. अनेकदा गटागटाने आगार कार्यालयात जाऊन ही प्रक्रिया पार पाडली जात होती. आता मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी दिलेल्या नावाच्या यादीनुसार, संबंधित विद्यार्थ्यांना पास थेट त्यांच्या शैक्षणिक संस्थेत एसटी कर्मचारी पोहोचवतील.

वेळ वाया जाणार नाही
‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ या विशेष मोहिमेला १६ जूनपासून औपचारिक सुरुवात होणार आहे. याआधी सर्व शाळा- महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सूचना दिल्या आहेत की, त्यांनी नववर्षासाठी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी, जेणेकरून पास वितरण सुरळीतपणे पार पाडता येईल. या योजनेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना थेट त्यांच्या शाळेतच एसटीचा पास मिळणार असून, त्यांचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

ही बातमी वाचा.  Xbox boss talks Project Scorpio price

विद्यार्थिनींना मोफत पास
दरम्यान, एसटीकडून विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात 66.66 टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच विद्यार्थ्यांना केवळ 33.33 टक्के शुल्क भरून मासिक पास मिळतो तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना एसटी पास मोफत दिला जातो.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.