सामाजिक
भारतीय बौद्ध महासभा शेंदुरजना घाट (मलकापूर ) च्या वतीनेधम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा…
महेंद्र हरले (प्रतिनिधी)

हि बातमी ईतर भाषेत वाचा
शेंदुरजना घाट:भारतीय बौद्ध महासभा शे .घाट मलकापूरच्या वतीने तिसऱ्या क्रमांकाची दीक्षाभूमी शेंदुर र्जना घाट मलकापूर जिल्हा अमरावती या ठिकाणी प्रियदर्शनी सम्राट अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन ६८ व्हा मोठ्या उत्साहात शें घाट नगरी मध्ये करण्यात आला. सकाळी नऊ वाजता दीक्षाभूमीवर धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून माहा मानवांच्या प्रतिमेला हार अर्पण करून बौद्ध विहार ते तिसरा क्रमांकाची दीक्षाभूमी पर्यंत धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले सायंकाळी सहा वाजता पुनश्च बुद्धविहार ते दीक्षाभूमी धम्म रैली काढून राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बुद्ध उपासक तथा उपासिका सर्वच समाजबांधव भगिनी उपस्थित होत्या.