
महाराष्ट्र राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक पार पडली.त्याची मतमोजणी 23 तारखेला होणार आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा येतात त्यापैकी नागपूर शहरात एकूण सहा विधानसभा येतात ज्यामध्ये पूर्व नागपूर, पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर, मध्ये नागपूर,आणि दक्षिण पश्चिम नागपूर अश्या एकूण सहा विधानसभा,
तर नागपूर ग्रामीणमध्ये सहा विधानसभा ज्यामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी , तसेच रामटेक विधानसभा अश्या सहा विधानसभा मिळून नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 12 विधानसभेची निवडणूक पार पडली,
या सर्व विधानसभेची मतमोजणी 23 तारखेला करण्यात येणार आहे,
सर्वच मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तिहेरी सुरक्षा व्यवस्था लावली आहे विशेष म्हणजे मतमोजणी केंद्रावर ड्रोनने नजर ठेवण्यात येणार आहे त्याबाबत पोलीस भावनात शहर पोलीस आयुक्त यांनी आढावा घेतला.
नागपूर शहरातील सहा मतदार संघाची या ठिकाणी होईल मतमोजणी:
उत्तर नागपूर :
सेंट उर्सला हायस्कूल व्हीसीए स्टेडियम जवळ सिव्हिल लाईन
दक्षिण पश्चिम नागपूर :
सामुदायिक भवन कम्युनिटी हाल सेंट्रल रेल्वे अजनी
दक्षिण नागपूर:
बचत भवन हरदेव हॉटेल समोर सीताबर्डी
पूर्व नागपूर :
ईश्वर देशमुख महाविद्यालय क्रीडा चौक
मध्य नागपूर:
जिल्हा परिषद शाळा काटोल रोड
पश्चिम नागपूर :
एस एफ एस कॉलेज सेमिनरी हिल्स
नागपूर ग्रामीण :
काटोल: प्रशासनिक इमारत तहसील कार्यालय काटोल
सावनेर:शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर
हिंगणा:
तहसील कार्यालय हिंगणा
उमरेड:नूतन आदर्श आर्ट्स कॉमर्स कॉलेज उमरेड
कामठी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी
रामटेक:
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यालय रामटेक