रिपब्लिक फेडरेशन ऑफ इंडियाने राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर विरोधात केले तीव्र आंदोलन…
प्रतिनिधी

नागपूर :रिपब्लिक फेडरेशन ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संघटने च्या संयुक्त विद्यमाने फेडरेशन चे अध्यक्ष सागर डबरासे यांच्या मार्गदर्शनात ओबीसी महासंघाचे विदर्भ युवा उपाध्यक्ष सचिन कापसे आणि रिपब्लिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल वंजारी यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर विरोधात नारे-निदर्शने केले
श्री.तुषार ठोंबरे अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी सागर डबरासे, सचिन कापसे, धर्मपाल वंजारी, गणेश मस्के, शरद दंडाळे, निलेश खडसन, अरविंद कारेमोरे, नितेश रंगारी, चंद्रशेखर आखरे, अनिल कडू, शिवशंकर आकोटकर, पुरुषोत्तम कांबळे, गोविंद शेंद्रे, सुरेश मोहाडे, अमर मुळे, सोबत सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यातील काही समाजकंटक ज्यामध्ये राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांनी अपमान जनक आणि विकृती बुद्धीचा परिचय देऊन जाणीवतापूर्वक सोशल मीडियावर संभाषण करून अपमान केलेला आहे,
त्यामुळे महाराष्ट्र तसेच देशातील बहुजनांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे राज्यात अत्यंत वाईट परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे तरी अद्यापही राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर वर सरकारद्वारे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही,
उलट राहुल सोलापूरकर यांना पुणे महानगरपालिकाने सांस्कृतिक धोरणांचा सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केली,
तर दुसरीकडे प्रशांत कोरटकर यांचा अद्यापही पोलीस विभागाने शोध लावलेला नसून त्याच्यावर सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही,
मागे काही दिवसापूर्वी अभिनेता सैफ अली खान यांच्या घरामध्ये चोरी करून त्यांच्यावर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशाचा असून तो बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत होता तरी त्याचा तपास पोलीस विभागाने तत्परतीने केला आणि त्याला अटक सुद्धा केली,
परंतु बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या या आरोपींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सन्मान देऊन तर दुसऱ्याला लपण्यामध्ये मुभा देऊन सरकार बहुजनांच्या भावनांशी खेळत आहे,
म्हणून आपण जर खरोखरच बहुजनांच्या आणि त्यांच्या महापुरुषांचा सन्मान करत असाल तर ताबडतोब प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जेणेकरून पुन्हा महाराष्ट्र सारख्या पुरोगामी विचाराच्या राज्यामध्ये असल्या घाणेरड्या कृत्या कोणताही व्यक्ती करणार नाहीत.
या दोन्ही सरकारने समाजकंटकांना अटक केली नाही तर रिपब्लिक फेडरेशन आणि ओबीसी महासंघ राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.