आपला जिल्हाताज्या घडामोडी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याचा जामीन फेटाळला…

प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

Nagpur: औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या दंग्यामुळे नागपूरमध्ये वातावरण तापले असतानाच आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा आरोप असलेल्या कथित दहशतवाद्याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला.

त्याच्या विरोधात सबळ पुरावे असल्याने त्याना जामीन देणे योग्य ठरणार नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. रईस शेख, असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने सप्टेंबर 2021 मध्ये काश्‍मीर येथून ताब्यात घेतले होते.
या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समक्ष सुनावणी झाली. कश्‍मीर पोलिसांनी एका प्रकरणात रईसला अटक केली असता त्याने 15 जुलै 2021 मध्ये नागपुरात (Nagpur) रेकी केल्याचे चौकशी दरम्यान समोर आले होते. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रईस जुलैमध्ये नागपूरला गेला होता. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर असा विमान प्रवास केला. त्यानंतर एका हॉटेलमध्ये रुम बूक केली आणि रिक्षाने दोन्ही ठिकाणांची रेकी केली.
या ठिकाणांचा व्हिडिओ घेऊन त्याने तो हस्तकाला पाठवला. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी (Police) रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि पुढे त्याला कश्मीरात जाऊन ताब्यात घेतले होते. पाकव्याप्त काश्मीरमधून जैश-ए-मोहम्मदच्या हस्तकाच्या सांगण्यावरून रईस शेख जुलै 2021मध्ये नागपुरात आला होता.
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आणि हेडगेवार स्मृती मंदिराची त्याने पाहणी केली आणि तो कश्मीरला परतला, असा आरोप त्याच्यावर आहे. न्यायालयाने ठोस पुरावे लक्षात घेत रईसचा जामीन अर्ज फेटाळला. रईस शेखतर्फे ॲड. निहालसींग राठोड यांनी तर राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील, ज्येष्ठ विधिज्ञ देवेन चौहान यांनी बाजू मांडली.

ही बातमी वाचा.  महाराष्ट्र विधानसभा, भाजपा ची पहली यादी जाहीर...

रईस जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात
रईसने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांशी असलेले संबंध दर्शविणारी कागदपत्रे आमच्या समोर आहेत. रईस पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या सदस्यांशी सतत संपर्कात होता, हे यातून प्रथमदर्शनी दिसून येते. रईसकडे जम्मू-कश्मीरमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांकडून मिळवले जिवंत हँडग्रेनेड आढळले. ही बाब लक्षात घेत रईसला जामीन देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.