राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पहल्या यादीत अनिल देशमुख आणि दुनेश्वर पेठे ची उमेदवारी जाहीर…
मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे. याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे.तसेच महाविकास आघाडी मध्ये वादाच्या भोवऱ्यात असलेल्या नागपूर जिल्ह्यात काटोल मतदार संघातून अनिल देशमुख आणि पूर्व नागपूर विधानसभातुन नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना उमेदवारी मिळाली आहे.
Ncp sharadchandra pawar
उमेदवारांची यादी
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख
घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे
बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे
शिरुर – अशोक पवार
शिराळा – मासिंगराव नाईक
विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत – जामखेड – रोहित पवार
अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे
तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर – विजय भामरे
केज – पृथ्वीराज साठे
बेलापूर – संदीप नाईक
वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
जामनेर – दिलीप खोडपे
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व – दुनेश्वर पेठे
किरोडा – रविकांत गोपचे
अहिरी – भाग्यश्री आत्राम
बदनापूर – बबलू चौधरी
मुरबाड – सुभाष पवार
घाटकोपर पूर्व – राखी जाधव
आंबेगाव – देवदत्त निकम
बारामती – युगेंद्र पवार
कोपरगाव – संदीप वरपे
शेवगाव – प्रताप ढाकणे
पारनेर – राणी लंके
आष्टी – मेहबूब शेख
करमाळा – नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
चिपळूण – प्रशांत यादव
कागल – समरजीत घाटगे
तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
हडपसर – प्रशांत जगताप.