देश विदेशमहाराष्ट्रराजकीय

बसपा माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने बसपातुन निलंबित….

विशेष प्रतिनिधी

हि बातमी ईतर भाषेत वाचा
Share

बसपा मध्ये नेहमीच ऐनवेळी भुचाल येतो हे काही नवीन नाही,”बसपात प्रदेशाध्यक्षपदाचा मुकूट काटेरी समजला जातो. त्याचा पुन्हा प्रत्यय आला. अनेक माजी प्रदेशाध्यक्षाप्रमाणे महाराष्ट्राचे बसपचे प्रदेशाध्यक्ष आणि तेलंगणचे प्रदेश प्रभारी ॲड. संदीप ताजने यांचीसुद्धा पक्षातून हकालपट्टी केली आहे. यापूर्वी बसापचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले श्रीकृष्ण उबाळे, सिद्धार्थ पाटील, राहूल तेलंग, विलास गरुड, सुरेश साखरे, यांचीसुद्धा पक्षाने हकालपट्टी केली आहे.”यापैकी नागपुरातील सुरेश साखरे यांची तर मायावतीयांनी तब्बल दोन वेळा हकालपट्टी केली आहे,

सुरेश साखरे यांच्याकडे  2007 ला बसपा उपाध्यक्ष सोबत सोबत नागपूरचा प्रभार होता, त्यापूर्वी 2002 मध्ये नागपूर महानगरपालिकेत बसपाचे 9 नगरसेवक होते परंतु सुरेश साखरेच्या काळात नागपूर मनपात बसपाचे 9 वरून फक्त 4 नगरसेवकच मनपा मध्ये निवडून आले त्यामुळे बसपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उठला आणि साखरेनी पैशासाठी पक्ष विकला अशी चर्चा मोठ्या प्रमाणात झाली  या विरोधात नारी रोड येथील बसपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी “सुरेश साखरे हटाव बसपा बचाओ” नावाचे आंदोलन जवळपास 2 आठवडे चालवले,याची मायावती यांनी दखल घेऊन सुरेश साखरे यांची बसपातुन हकालपट्टी केली, परंतु साखरे यांनी पुन्हा पक्ष प्रभारी विरसिंग यांच्याशी साठगाठ करून 2018 च्या काळात बसपा चे प्रदेश अध्यक्ष पद खेचून आणले व यादरम्यान त्यांना 2019 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका मिळाल्या त्यामध्ये बसपाचे प्रदर्शन खुपच निराशाजानक झाले,त्यामुळे पुन्हा बसपा कार्यकर्त्यांनी सुरेश साखरे यांच्या विरोधात “साखरे हटाओ” आंदोलन चालविले त्यामुळे बसपा सुप्रीमो मायावती यांनी सुरेश साखरे यांची कायमस्वरूपी बसपातुन हकालपट्टी केली म्हणजेच सुरेश साखरे यांची बसपातुन तब्ब्ल्ल दोनदा हकालपट्टी झालेले व्यति आहेत.

ही बातमी वाचा.  देवेंद्र भुयार होल्डवर.....

“रिपाईची शकले झाल्यानंतर बसपाला राज्यात पक्ष वाढीसाठी मोठी संधी निर्माण झाली होती. मात्र आपसातील भांडणे, मतभेद आणि विविध पक्षाच्या दावणीला बांधलेल्या कार्यकर्त्यांमुळे बसपाच्या हत्तीची चाल आता मंदावली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा(vanchit bahujan aaghadi) आघाडीच्या प्रयोगामुळे बसपाच्या मतपेढीलाही मोठा धक्का बसला आहे. असे असतानाही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचे सत्र बसपाने कायम ठेवले आहे.”

“नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची एक सभा उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात घेण्यात आली. यावेळी १५ हजारसुद्धा त्यांचे समर्थक उपस्थित नव्हते. लोकसभेच्या निवडणुकीत नागपूरमध्ये बसपाचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष असायचे. दलितांची मोठी मते घेणार असल्याने खासकरून भाजप बसपाच्या उमेदवाराकडे लक्ष ठेवून असयाचा. काँग्रेसच्या पराभवातही बसपाची(BSP) भूमिका यापूर्वी महत्त्वाची ठरली आहे. असे असले तरी बसपाने लोकसभेसाठी नेहमीच विविध पक्षातील आयात उमेदवारांवर आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांपेक्षा अधिक विश्वास टाकला. त्यामुळे निवडणूक आटोपली की त्यांचा लोकसभेचा उमेदवार गायब व्हायचा.”

आपला मतांचा टक्का वाढावा यासाठी हा प्रयोग केल्याचा दावा बसापच्यावतीने आजवर केला जात होता. मात्र त्याचा फायदा तर झालाच नाही दुसरीकडे आयात उमेदवारही मिळणे बसपाला आता अवघड झाले आहे. काँग्रेस आणि भाजपच्या लेखीसुद्धा बसपचे महत्त्व उरले नाही. त्यात अनेकांना बाहेर हाकलल्या जात असल्याने बसपाचे कॅडर चांगलेच दुखावले आहे.

ही बातमी वाचा.  Why people are flocking to Oregon

Share

मुख्य संपादक - सागर उर्फ मनोहर डबरासे

यह पोर्टल संपादक मालिक प्रकाशक सागर उर्फ मनोहर डबरासे द्वारा कार्यालय दर्शन एक्सप्रेस न्युज दीक्षित नगर नारी रोड नागपूर से प्रकाशित किया गया हैं, प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही! प्रकाशित किसी भी लेखन पर आपत्ती होने पर उनका निस्तारन सूचना प्रौद्योगीकी( प्लॅटफॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता ) विनिमय 2021 की तहत किया जायेगा!

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.