सुशील बेले यांनी वरूड मोर्शी मतदार संघातुन आजाद समाज पार्टी तर्फे केले नामांकन दाखल…
अमरावती प्रतिनिधी

मोर्शी: वरूड मोर्शी मतदार संघात नामांकन दाखल करण्याची धामधूम सुरू असताना 28 ऑक्टोबर रोजी आजाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सुशील बेले यांनी सकाळी 11 वा. वरूड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून संपूर्ण कार्यकर्त्यांसह दुपारी 1 वाजता मोर्शी येथील सिंभोरा चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून असंख्य जनसमुदायासोबत महापुरुषांच्या घोषना देत उपविभागीय कार्यालय मोर्शी येथे आपले नामांकन दाखल केले, यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष मा.मनीष साठे तसेच मतदार संघातून असंख्य कार्यकर्ते , मार्गदर्शक , सहकारी , समर्थक प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रशेखर आझाद (रावण) हे उत्तर प्रदेश मधून येतात जेव्हा प्रस्थापित मनुवादी लोकांनी सऱ्हाणपूर जिल्ह्यात दलितांची घरे जाळली त्याला त्यांच्याच भाषेत चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना उत्तर दिले त्यामुळे त्यांची लोकप्रियता उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात आहे आता हल्ली ते नगीना लोकसभा क्षेत्रातून आझाद समाज पार्टीचे खासदार आहेत,
त्यांनी काँग्रेस भाजपा सारख्या पक्षांना मात देण्यासाठी आझाद समाज पार्टीची स्थापना केलेली आहे आणि ही आजाद समाज पार्टी मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारावर चालणारी असून शोषित पीडित समाजाला राज सत्तेमध्ये भागीदारी देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे असे चंद्रशेखर आझाद यांचे म्हणणे आहे.